Navratri 2024 | Thanyachi Durgeshwari | ठाण्याच्या दुर्गेश्वरीसाठी खास देखावा; पहिली झलक पाहाच
नवरात्रीला उद्यापासून सुरुवात होत आहे आणि याचपार्श्वभूमीवर मुंबईसह ठाण्याची देवी देखील जगभरात प्रसिद्ध असलेली ठाण्याची दुर्गे दुर्गेश्वरी म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील टेंभी नाका याठिकाणी देवी विराजमान होते. लालबागच्या राजाच दर्शनाप्रमाणेच टेंभी नाक्याच्या दुर्गे दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी जमलेली असते. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा टेंभीनाक्याच्या देवीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.
यंदा हिमाचल प्रदेशात असणारे जटायू मंदिर याठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. याठिकाणी या सजावटीची उंची 121 फुट ही उंची आहे. तसेच याच ठिकाणी मधोमध ठाण्यातील टेंभी नाक्याची दुर्गदुर्गेश्वरी देवी विराजमान होणार आहे. कळव्यातून देवीची भव्य अशी मिरवणुक काढून ही देवी सायंकाळी 7 ते 8 वाजे पर्यंत याठिकाणी विराजमान होणार आहे. यंदा देवीसाठी उभारण्यात आलेल्या सजावटीमध्ये संपुर्ण 12 ज्योतिलिंग आहेत त्यांचे वैशिष्ट दाखवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला एक मोठा झुंमर लावण्यात आलेला आहे.